कर्नाटकात बीजेपीचे 12 मंत्री निवडणूक पराभूत,
भारतीय जनता पार्टीचा सत्तेसाठी काहीही करण्याचा जनतेमध्ये मोठा रोष
मुंबई / तुळजापूर दिनांक 13 डॉ सतीश महामुनी
सत्ता मिळवण्यासाठी आणि बळजबरी सत्ता स्थापन करण्यासाठी अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टीने जे प्रयत्न केलेले आहेत ते राजकारणामध्ये योग्य असले तरी जनमानसामध्ये अशा निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीची मूळ विचारधारा मानणारे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत त्याचाच परिपाक म्हणजे कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचा झालेला दारुण पराभव ही आहे. या पराभवाचे फारसे कोणाला आश्चर्य वाटले नाही त्याचे कारण म्हणजे मूळ धोरणाला मूठ माती देऊन कोणत्याही पातळीवर उतरून सत्ता स्थापन करण्याची भाजपची दिवसेंदिवस वाढत चाललेली महत्त्वकांक्षा.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुंबई यांच्या मंत्रिमंडळामधील आठ मंत्री पराभूत झाली आहेत एखाद्या राज्याचे आठ मंत्री पराभूत होणे यापेक्षा दुसरा कुठलाही पराभव असू शकत नाही मंत्री हा संपूर्ण राज्याचा कारभार करणारा महत्त्वाचा व्यक्ती असतो त्याला आपला मतदारसंघ सामान्य एवढे देखील जनमत त्याच्याजवळ नसेल तर त्याच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी काय केले असेल याचा सहजपणे अंदाज येतो.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपूर्ण देशात आहे आजही आहे आणि उद्या देखील राहणार आहे 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच कोणा पंतप्रधान होणार आहेत हे देखील जनतेच्या मनामध्ये निश्चित झालेले आहेत त्यांनी केलेल्या विकासाच्या योजना त्यांनी केलेले प्रशासनातील बदल त्यांनी केलेल्या ऑनलाईन सेवा अनेक क्षेत्रांमध्ये अनेक वर्ष झालेले दुर्लक्ष आणि त्या क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेले भरीव योगदान खूप मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारने भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विकास काम केलेले आहे केवळ काही मोजक राज्यांमध्ये राजकीय विरोधामुळे त्यांच्या योजना राबविण्यात आल्या नाहीत परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणाला कलाटणी देणारे हुकमी राजकारणी ठरले आहेत भारतीय जनता पार्टीला च्या कार्यकर्त्याला आणि प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या प्रदेशाध्यक्षापासून जिल्हाध्यक्षपदीच्या व्यक्तींना नरेंद्र मोदी यांच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवणे किंवा या योजनांचा जनमानसामध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे जमले नाही नको त्या गोष्टी बोलायच्या विरोधकांना लोकांच्या भाषेमध्ये टीका करून रोज उडवून घ्यायचा आपण कोणत्या पदावर बसलो आहोत किती मोठ्या पदावर आपण काम करीत आहोत याचा विसर पडलेले अनेक नेते भारतीय जनता पार्टीमध्ये बेताल वक्तव्य करून पक्षाला त्यांनी जनतेच्या रोशाला सामोरे जाण्यासाठी पुढे आणले आहे अगदी महाराष्ट्रामध्ये देखील अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या बोलण्यामुळे पक्षाची मानहानी स्वीकारली आहे.

वाडवडिलांनी संपत्ती कमवायची आणि मुलांनी मात्र ती उधळून लावायची अशा प्रकारची प्रवृत्ती भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात वाढली आहे केवळ प्रसिद्धीसाठी आणि सोशल मीडियाचा उपयोग करण्यासाठी राजकारण करणारे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये जमा झाले आहेत मोठ्या प्रमाणावर गुत्तेदारी करणारे लोक लोकप्रतिनिधी झाले आहेत गुत्तेदारी देखील त्यांनीच करायची आणि राजकारण देखील त्यांनीच पाहायचं अशी दुहेरी भूमिका करणारी स्वार्थी लोक भाजपामध्ये दाखल झाल्यामुळे प्रामाणिक आणि वर्षानुवर्षी पक्षाचे काम करणारे लोक दडपून मरून गेले आहेत उलट त्यांनाच तुम्हाला राजकारण करता येत नाही अशा प्रकारची मुद्दाम भाषा नव्या कार्यकर्त्याकडून वापरली जाते आहे महाराष्ट्रामध्ये तर भाजपने कहर केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांच्यावर जनतेने अनेक वर्ष ठेवला होता असे लोक भाजपामध्ये घेतले तेव्हा तर भाजपाच्या सगळ्या धोरणांची वाट लागली आहे परंतु सत्ता आहे म्हणून सर्वजण एकमेकांना छान छान बोलतात आणि वेळ भागवून घेतात अशी परिस्थिती आहे कर्नाटकचा पराभव कोणालाही नवीन वाटत नाही कर्नाटक मध्ये जे झाले ते व्हायलाच पाहिजे अशा भावनात उत्पन्न झाले आहेत